नागपूरच्या विमानांना पक्ष्यांचा / नागपूरच्या विमानांना पक्ष्यांचा धोका

टीम दिव्य मराठी

Jun 06,2011 08:56:37 PM IST

नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर विमानतळाला सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. विमानतळाच्या भिंतीबाहेरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध मांस विक्रीची दुकाने उभी आहेत. मांस विक्री करणारी दुकाने विकण्यालायक नसलेले मांसाचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात फेकून देतात. ते तुकडे खाण्यासाठी आकाशामध्ये पक्ष्यांची एकच गर्दी होते. त्यामुळे उड्डाण घेणा-या व उतरणा-या विमानांना अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र सध्या नागपूर आंतरराष्टङ्खीय विमानतळावर दिसत आहे. गतवर्षात पक्ष्यांनी विमानांना धडक मारल्याच्या तीन घटना घडल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी विमानतळाच्या धावपट्टीवर हरिण आणि कुत्र्याने शिरकाव केला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिका-यांनी या प्राण्यांना विमानतळामधून बाहेर काढले. दरम्यान, मिहान इंडिया प्रा. लि., एमआयपीएलचे अधिकारी या प्रकाराने पुरते वैतागले आहेत. यामध्येच विमातळाच्या आजूबाजूला घिरट्या घालणा-या पक्ष्यांचा उच्छाद हा विमानतळाच्या अधिका-यांना त्रासदायक ठरत आहे. मांसाच्या तुकड्यांसाठी आकाशामध्ये घिरट्या घालणा-या पक्ष्यांची धडक विमानाला बसू शकते, असे विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.X
COMMENT