प्रकल्पग्रस्तांना मिळणार साडेबारा / प्रकल्पग्रस्तांना मिळणार साडेबारा टक्के विकसित जमीन

Jun 19,2011 04:13:01 PM IST

नागपूर - मिहान प्रकल्पग्रसांना विकसित जमीन दिली जाणार असून तसा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवणार असल्याचे एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक युपीएस मदान यांनी सांगितले आहे.

शनिवारी मदान यांनी दिवसभर विभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा केली. यावेळी बहुतेक जणांनी विकसित जमीन देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन एका महिन्यात या एकाच विषयावर तीनवेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. शनिवारची बैठक ही शेवटची बैठक होती, आता यानंतर आठ दिवसांत मंत्रीमंडळासमोर अहवाल सादर केला जाणार आहे. साडेबारा टक्के विकसित जमिनीच्या बदल्यात मोबदला किती द्यायचा याचा निर्णय मंत्रिमंडळातर्फे घेतला जाईल. मिहान प्रकल्पासाठी जर जमीनींची गरज नसेल तर जमीन मोकळी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मिहान प्रकल्पातर्फे मदान, विभागीय आयुक्त बी. व्ही. गोपालरेड्डी, जिल्हाधिकारी कौस्तुभ राव तर, प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर वावनकुळे, शिवणगावतर्फे बाबा ठवरे आणि भामटी परसोडीच्या वतीने विजय राऊत यांनी बाजू मांडली.

X