अल्पवयीन मुलीला विकणा-या / अल्पवयीन मुलीला विकणा-या तिघांना नागपूरात अटक

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 27,2011 01:10:53 AM IST

नागपूर: अल्पवयीन मुलीला 30 हजार रुपयात विकण्याचा एकाचा डाव नागपूर पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल मेश्रामसह (रा. अमरावती) तीन जणांना अटक केली आहे. राहूलने एका अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून नागपूरात आणले. त्याने त्या मुलीला आपल्या नातेवाईकांकडे ठेवले होते. चंद्रपूर येथील दोन जणांसोबत त्यांने त्या मुलीचा 30 हजार रुपयांमध्ये सौदा केला होता. मात्र राहुलचे फोनवरचे संभाषण त्याच्या नातेवाईकांनी ऐकले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली आहे.
अल्पवयीन मुलींना नोकरी देण्याचे आमिष दाखवून नागपूरात आणून त्यांची विक्री केली जात असण-यांचे मोठे रॅकेट असावे, असा पोलिसांना संशय व्यक्त केला आहे.

X
COMMENT