पगार मागायला गेलेल्या / पगार मागायला गेलेल्या सुरक्षा रक्षकाचा मालकाने केला खुन

Jun 23,2011 05:45:47 PM IST

नागपूर - पगार मागितला म्हणून सुरक्षा रक्षकाचा एजन्सी मालकाने खुन केला आहे. संतोष विश्वकर्मा असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

दिपक केअर सर्विसमध्ये तो कामाला होता. संतोषचा ३६ दिवसांचा पगार बाकी होता. पगार मागण्यासाठी तो एजन्सी मालक दिपक पांडेकडे गुरुवारी दुपारी गेला होता. मात्र मालकाने पगार देण्यावरुन संतोषशी वाद केला. त्यातच एजन्सी मालक दिपकने सुरक्षा रक्षकाला इमारतीवरुन खाली फेकले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान संतोषचा मृत्यू झाला. दिपक पांडेला खुनाच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.

X