नागपुरात उन्हाचा पारा / नागपुरात उन्हाचा पारा 45 अंशांवर; उकाडा वाढला

divya marathi team

Jun 01,2011 04:06:13 AM IST

नागपूर - दोन आठवड्यांपूर्वी तुफानी वादळ आणि पावसाचा तडाखा बसल्यानंतर नागपूरकरांना आता कडाक्याच्या उन्हाची झळ बसत आहे. सोमवारी शहराचे तापमान 44.8 एवढे नोंदवण्यात आले असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणात मोठय़ा प्रमाणावर आर्द्रता निर्माण झाल्यामुळे अचानक तापमान कमी होऊन ढगाळ वातावरणाचा अनुभवदेखील नागपूरकरांना येत आहे. पुढील दोन दिवस 44 च्या जवळपास तापमान राहणार असून ऊन-सावलीचा खेळदेखील सुरू राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मृग नक्षत्राला अवघ्या आठ दिवसांचा कालावधी उरला असताना तापमानात होणारी वाढ चिंताजनक आहे.

X
COMMENT