Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | ncp, rashtrawadi, ratnagiri

रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण

Agency | Update - Jun 09, 2011, 11:54 AM IST

कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडी सरकारच्या राजवटीत महागाईने जनता त्रस्त झाली असताना रत्नागिरीत रस्त्यांच्या दूरावस्थेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरच आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.

  • ncp, rashtrawadi, ratnagiri

    रत्नागिरी: कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडी सरकारच्या राजवटीत महागाईने जनता त्रस्त झाली असताना रत्नागिरीत रस्त्यांच्या दूरावस्थेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरच आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. दाभीळ आंबेरे ते डोर्ले या रस्त्याची दूर्दशा झाल्याने डोर्ले येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे.
    डोर्ले येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मरण यातना सहन करतोय. या रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहे. आंबेरेचे उपसरपंच जितेंद्र शिरसेकर, अजय तेंडुलकर, महेश साखरकर, अभय हळदणकर, जयवंत बिर्जे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

Trending