Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Palak Mantri, Chagan Bhujbal, Nashik Blast

नाशिकचा स्फोट हा अपघात: भुजबळ

Agency | Jun 09, 2011, 15:14 PM IST

  • नाशिकचा स्फोट हा अपघात: भुजबळ

नाशिक: शहरातील तारवालानगरातील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये झालेला स्फोट हा घातपात नसून तो अपघात असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पोलिसांना तपासादरम्यान कोणतेही पुरावे आढळून आले नाही. असेही भुजबळ यांनी आज (गुरूवारी) सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अजून यायचा आहे. त्यानंतरच याबाबात अधिकृतपणे सांगता येईल, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, पंचवटी भागातील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याने नाशिक हादरले होते. स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले. या संदर्भात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. इमारतीच्या तळमज्यावर असणºया गाळ्यांमध्ये फटाक्यांचा मोठा साठा होता. त्यामुळे एवढा भीषण स्फोट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Next Article

Recommended