माहूरच्या प्रवाशांना बुलडाण्यात / माहूरच्या प्रवाशांना बुलडाण्यात लुटले

divya marathi

Jun 24,2011 11:27:24 AM IST

बुलडाणा । पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या कारमधील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून सुमारे चाळीस हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटे बीबी ग्राम पेट्रोलपंपावर घडली.
माहूर तालुक्यातील शेकापूर गावाचे सरपंच सुनील बेदरे, ग्रामसेवक ए. जी लुटे, गजानन बेदरे हे पुणे येथील निर्मलग्राम पुरस्काराच्या कार्यक्रमास हजेरी लावून गावाकडे परतत होते. मंगळवारी पहाटे बुलडाण्यातील बीबी पंपावर ते कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील २६ हजार रुपये नगदी, ३ मोबाइल, एक सोन्याची अंगठी असा एकूण ३९ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पंपावरील कर्मचाºयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींना त्यांच्यावरही दगडफेक करत पलायन केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी एम. एच. पाटील, लोणारचे फौजदार दीपक बुधवंत, घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, श्वानपथकाद्वारे चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांना केला परंतु त्यांचा माग लागला नाही.

X
COMMENT