मध्य प्रदेशातून फरार / मध्य प्रदेशातून फरार झालेल्या तीन दरोडेखोरांना नागपूरात अटक

Agency

Jun 07,2011 11:40:10 PM IST

नागपूर: 2009मध्ये सराफी व्यापार्‍याला लटून मध्य प्रदेशातून फरार झालेल्या तीन दरोडेखोरांना अटक करण्यात गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. नासिर खान रहमान खान(22), अजीम खान ऊर्फ अज्जू सलीम खान(27) व साहेल खान जलील खान (22) असे या आरोपींची नावे आहेत. 2009मध्ये यांनी मध्य प्रदेशातील शहापूरा गावात सराफी व्यापार्‍याला मारहाण करून त्याच्याकडील 22 किलो चांदी, 200 ग्रॅम सोने आणि 75 हजार रोख लांबविले होते. तिघांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

X
COMMENT