रॅगिंग प्रकरणात विद्यार्थी / रॅगिंग प्रकरणात विद्यार्थी तीन महिन्यांसाठी निलंबित

Jun 18,2011 01:52:31 AM IST

नागपूर: येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जवळपास महिनाभर गाजलेल्या रॅगिंग प्रकरणात केवळ एका विद्यार्थ्याला दोषी ठरवण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला तीन महिन्यांसाठी कॉलेजमधून निलंबित करण्यात आले आहे.
ही कारवाई करताना कॉलेज प्रशासनाने कमालीची गुप्तता बाळगली होती. दरम्यान, दंत महाविद्यालयातील अ‍ॅण्टी रॅगिंग कमिटीला अंधारात ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या महाविद्यालयातील चिराग भावसार या विद्यार्थ्याची पाच विद्यार्थ्यांनी रॅग्ािंग घेतली होती. यामुळे चिराग भावसार त्याचा प्रवेश रद्द करून पुण्याला घरी निघून गेला. रॅगिंगमुळे प्रवेश रद्द केल्याचे समजल्यामुळे चिरागच्या वडिलांनी दंत अधिष्ठातांकडे रीतसर तक्रार केली. महाविद्यालयाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र या प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाल्यामुळे पाच विद्यार्थ्यांवर ठेपका ठेवून महाविद्यालयाने केवळ एकाच विद्यार्थ्यावर कारवाई केली.

X