विदर्भात पावसाची सलामी / विदर्भात पावसाची सलामी

प्रतिनिधी

Jun 28,2011 05:20:40 AM IST

नागपूर - गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भातील बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली आहे.

यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस होऊन ५० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भातील अनेक भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. विदर्भातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून पूर्व आणि पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे.

X
COMMENT