वाशीम जिल्ह्यात तीन / वाशीम जिल्ह्यात तीन दिवस रिमझिम, बळीराजा समाधानी

Jun 29,2011 05:23:16 AM IST

वाशीम - गेल्या तीन दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदून गेले आहेत. मात्र, पेरणीसाठी पावसाने उघडीप द्यावी, अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत रिसोड व कारंजा तालुका वगळता उर्वरित चारही तालुक्यांमध्ये ६४.४ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ६०५.७ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी सुरू झालेल्या या पावसाच्या अधूनमधून जोराच्या सरी कोसळल्या. तीन दिवसांच्या पावसाने शेतात पाणी साचले आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतात वाफसा येण्याची वाट पाहत आहेत. गेल्या चोवीस तासांत मानोरा तालुक्यात सर्वाधिक २३.६ मि. मी. पाऊस पडला. दुसरीकडे वाशीममध्ये १४ मि. मी., मालेगाव- १७.४, तसेच मंगळूरपीरमध्ये ९.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

X