...तर राज यांच्या / ...तर राज यांच्या फार्म हाऊस, कोहिनूर मिलच्या जागेचे काय? आठवलेंचा पलटवार

agencies

Jun 03,2011 08:40:16 AM IST

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरुन वाद वाढतच आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे. नागपुरात पत्रकारांसोबत बोलतांना ते म्हणाले, राज ठाकरे यांनी माझ्या वांद्रे येथील निवासस्थानाला नामांतराच्या वादात ओढले आहे. त्यांना तसे करण्याची गरज नव्हती. पण, त्यांच्या मालमत्तेचे काय? मुंबईतल्या कोहिनूर मिलची जागा आणि राज ठाकरेच्या मालकीच्या फार्म हाऊसच्या जागेची चौकशी करावी, अशी मागणी आठवले यांनी केली. शिवसेना-भाजप-रिपाइं या नव्या समीकरणामुळे राज अस्वस्थ झाल्याची टिकाही आठवले यांनी केली.
आठवले यांनी नुकतीच शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरुन राज ठाकरे आणि आठवले यांच्यात शाब्दिक जुगलबंदी सुरु झाली आहे. शिवसेनाप्रमुख यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या आठवले यांच्या चार मजली घराबाबत राज यांनी प्रश्रचिन्ह उपस्थित केले होते.आपले मत
राज ठाकरे आणि रामदास आठवले यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे महाराष्ट्रात नवा वाद भडकेल काय? आपले मत पुढील बॉक्समधून व्यक्त करा. आपत्तीजनक कॉमेंटसाठी वाचक स्वतः जवाबदार असतील.X