वैद्यकीय अधिका-यांना नियुक्तीच्या / वैद्यकीय अधिका-यांना नियुक्तीच्या ठिकाणी रहाण्याचे आदेश

divya marathi team

Jun 05,2011 11:04:04 PM IST

रत्नागिरी - "पावसाळ्यामुळे आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवतात त्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क रहायला हवी.तसेच वैद्यकीय अधिका-यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे," असे निर्देश नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी यांनी दिले आहेत.
अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर दळवी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची पहिलीच सभा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, शिक्षण आणि अर्थ सभापती शरद लिंगायत, आरोग्य आणि बांधकाम सभापती सुरेश लाड, समाजकल्याण सभापती शांताराम जाधव, महिला व बालकल्याण सभापती श्वेता गडदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर उपस्थित होते.
स्थायी समितीच्या सभेत रोहिणी दळवी यांनी सुरुवातीलाच जिल्ह्यातील साथरोगाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील बहुतेक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हे नियुक्तीच्या गावी रहात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवतात. सध्या साथरोग वाढण्याची शक्यता आहे. त्या रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच जे अधिकारी कुचराई करतील त्यांच्यावर एक महिन्याच्या वेतन कपातीचे निर्देश रोहिणी दळवी यांनी दिले आहेत.

X
COMMENT