पहिल्या पावसाने रत्नागिरीत / पहिल्या पावसाने रत्नागिरीत हजारोंचे नुकसान

divya marathi team

Jun 04,2011 10:51:16 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी पावसाने हजेरी लावली. काल दिवसभर विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने चिपळूण, संगमेश्वर, आणि लांजा येथे तीन घरांचे मिळून 37 हजारांचे नुकसान झाले आहे. कोकणात मान्सून सक्रीय होण्यासाठी अजून तीन -चार दिवस वाट पाहावी लागणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात पुढील 48 तासांत 7 ते 12 इंच पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. काल सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 36.5 मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधीक पावसाची नंद संगमेश्वर तालुक्यात 139 मिलिमीटर पाऊस झाली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. पावसाच्या सरींनी हवेत गरवा आला असून पहिल्या पावसात दुचाकीस्वाराची तारांबळ उडाली. काही किरकोळ अपघात घडले. पावसामुळे चिपळुणातील एका घराचे अंशत:

X
COMMENT