कोकणामध्ये लवकरच उभा / कोकणामध्ये लवकरच उभा राहणार 'सागरी विश्व प्रकल्प'

प्रतिनिधी

Jun 02,2011 03:28:59 AM IST

मुंबई - कोकणासारख्या निसर्गरम्य ठिकाणी सागरी जलचरांचे काचेच्या बोगद्यातून निरीक्षण करता यावे आणि डॉल्फिनच्या कसरती पाहता याव्यात म्हणून 'सागरी विश्व प्रकल्पा'बाबतच्या तांत्रिक-व्यापारिक शक्याशक्यतेचा अहवाल बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांना आज सादर करण्यात आला. या प्रकल्पाची जागा मुंबई आणि गोवा या दोन्ही ठिकाणी येणा:या पर्यटकांना आकृष्ट करेल अशी हवी. संपूर्ण देशात अशाप्रकारचा हा एकमेव प्रकल्प असल्याने पर्यटकांची खर्च करण्याची क्षमताही लक्षात घ्यायला हवी. तसेच पर्यावरणाला त्याने बाधा पोहोचणार नाही याचा विचारही व्हायला हवा, असे छगन भुजबळ यांनी अहवाल बघितल्यावर सांगितले. केंद्राच्या सायन्स अॅण्ड टॅक्नॉलॉजी पार्कचे प्रमुख राजेंद्र जगदाळे यांनी हा अहवाल आज भुजबळांना सादर केला. या प्रकल्पामुळे भारतातील नावीन्यपूर्ण जलचर काचेच्या आडून पर्यटकांना नैसर्गिक रुपात पाहता येतील. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी रुपये ५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

X
COMMENT