रायगडावर आज शिवराज्याभिषेक / रायगडावर आज शिवराज्याभिषेक

प्रतिनिधी

Jun 06,2011 03:19:18 AM IST

अलिबाग - किल्ले रायगडावर उद्या सोमवारी दि. 6 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला असून संभाजी ब्रिगेड आणि अन्य काही संघटनांनी शिवसमाधीसमोरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीस आक्षेप घेतल्यामुळे किल्ल्यात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा मोठय़ा उत्साहात दरवर्षी सहा जून रोजी साजरा केला जातो. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचा या कार्यक्रमात पुढाकार असतो. शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे वाघ्या कुत्र्यांची समाधी ही अप्रस्तुत वाटते असे मत गेल्या महिन्यात संभाजी ब््िरागेडने व्यक्त करून ही समाधी हटवावी अशी मागणी केली होती. त्यावर गदारोळ होऊन वाद- प्रतिवादही झाले. तुकोजीराव होळकर यांनी ती समाधी रायगडावर बांधली. धनगर समाजात तसेच आपल्या संस्कृतीत श्वानाला त्याच्या निष्ठेमुळे देवाचा दर्जा दिला आहे. म्हणूनच खंडोबासारख्या देवाने श्वानाला जवळ ठेवल्याची कथा आहे. त्यामुळे रायगडावरील ही समाधी योग्य आहे असा दावा पुणे येथील संशोधक संजय सोनवणे यांनी सप्रमाण केला होता. मात्र, शिवचरित्रामध्ये वाघ्याचा उल्लेख कुठेही नाही. केवळ राजसंन्यास नाटकामध्ये एका स्वगतात वाघ्याचा उल्लेख आहे, असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे. उद्या सकाळी पाच वाजता राज्याभिषेक सोहव्व्यास सुरुवात होणार असून दुपारी 12 वाजता सांगता होणार आहे.

X
COMMENT