बंद सिग्नलमुळे अपघातांची / बंद सिग्नलमुळे अपघातांची शक्यता वाढली

divya marathi

Jun 17,2011 06:32:32 PM IST

नागपूर - शहर परिसरातील चौकांमध्ये लागलेले सिग्नल शो पीस झाले आहेत. काही सिग्नल तुटलेले आहेत तर काही बंद आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. महानगरपालिकेने सिग्नलच्या नुतनीकरणासाठी एका खाजगी कंपनीला ३ करोड रुपयांचे काम दिले आहे. पण अजून त्या कंपनीने काम सुरु केलेले नाही. सिग्नल खराब असल्यामुळे चौकांमध्ये अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. कोणी स्वतःला वाचवत आहे, तर कोणी बेधडक गाडी चालवत आहे. ज्या चौकात पोलीस नाहीत तेथे वाहन चालक भरधाव वेगात गाड्या चालून अपघातांना निमंत्रण देत आहेत.

X
COMMENT