नागपुर शहरातील तीन / नागपुर शहरातील तीन सोनोग्राफी केंद्रांवर छापे

Jun 29,2011 01:39:57 PM IST

नागपुर - शहरातील गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या तीन सोनोग्राफी केंद्रांना महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने छापे टाकून सील केले. शहरातील प्रतिष्ठित सोनोग्राफी केंद्रावर छापे टाकून त्यांना सील केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सील केलेल्या सोनोग्राफी केंद्रांमध्ये वर्धा रोडवरील डॉ.रमेश प्रकाश, रामदासपेठ येथील कर्णिक दरे, रामदासपेठमधीलच नागपूर सिटी स्कॅन केंद्र या सोनोग्राफी केंद्रांचा समावेश आहे.
स्त्री भ्रूणहत्याच्या वाढत्या घटना महाराष्ट्रात होत आहेत. त्या रोखण्यासाठी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जात आहे. तपासणीतून असे निष्पन्न झाले आहे की शहरातील प्रतिष्ठित दवाखान्यामध्ये सुद्धा गर्भलिंग परीक्षण केले जाते. वाढत्या स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने "स्त्री भ्रूणहत्याविरोधी अभियान' कार्यक्रम हाती घेतला आहे. छापा टाकणाऱ्या पथकामध्ये आरोग्य विभागाचे डॉ.विजय तिवारी,डॉ. विजय जोशी, डॉ. अतिक खान, कल्पना वानखेड़े,वैशाली पोटे हे होते.

X