भाजप नगरसेवक मिलिंद / भाजप नगरसेवक मिलिंद पाटणकर यांना फसवणूकीच्या आरोपात अटक

Jun 11,2011 03:22:39 PM IST

ठाणे - भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती मिलिंद पाटणकर यांना फसवणूक प्रकरणात 420 कलमाखाली अटक करण्यात आली आहे.
ठाणे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मिलिंद पाटणकर यांच्यावर एका सदनिका विक्री प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 406 नुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.चेंबूर येथे राहणारे विकास पाथरकर यांनी नौपाडा परिसरात एक सदनिका विकत घेण्या संबंधी आदित्य असोसिएट या कंपनीसोबत करार केला होता. या करारापोटी पाथरकर यांच्याकडून दहा लाख रुपये घेण्यात आले होते. मात्र त्यांना सदनिकेचा ताबा न मिळाल्याने पाथरकर यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आदित्य असोसिएटचे मिलिंद शेंबेकर, त्याची पत्नी मिलन यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली. या कंपनीत मिलिंद पाटणकर हेदेखील भागीदार होते त्यामुळे नौपाडा पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.
मिलिंद पाटणकर हे भाजपचे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्या अटकेनतंर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे.
X