'टाडा’तील तीन माओवाद्यांना / 'टाडा’तील तीन माओवाद्यांना वीस वर्षांनंतर अटक

divya marathi

Jun 23,2011 07:21:48 PM IST

गोंदिया । टाडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या तीन माओवाद्यांना तब्बल वीस वर्षांनंतर अटक करण्यात चिचगड पोलिसांना यश मिळाले आहे. मोहन बिरजू कुंभरे (वय ४७), माणिक दरसू ताराम (वय ४३) आणि तुकाराम धोंडू सलामे (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत. ३१ मे १९९१ रोजी रामलाल टेंभू सलामे यास ‘तोतया नक्षली म्हणून काम करतोस आणि आमची बदनामी करतो’, असा जाब विचारत या आरोपींनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सलामे याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सदर आरोपींना फरार घोषित केले होते. तसेच त्यांच्याविरोधात चिचगड येथील पोलिस ठाण्यात टाडा कायद्याअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, चिचगड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सापळा रचून रविवारी या तीन माओवाद्यांना अटक केली.

X
COMMENT