तीन मुलींनी केले / तीन मुलींनी केले पित्यावर अत्यसंस्कार

Jun 11,2011 03:17:46 AM IST

बुलडाणा- घरातील वडीलधा-या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी घरातील मोठा मुलगा किंवा मुलगा नसेल तर अन्य कोणी नातेवाईक अंत्यविधीचे कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र, मोताळा येथील निवृत्त प्राचार्य भाऊसाहेब इंगळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तीन विवाहीत मुलींनी आपल्या पित्याच्या देहाला अग्नी देऊन समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.

भाऊसाहेब इंगळे हे मोताळाच्या स्व. बबनराव देशपांडे महाविद्यालयातून प्राचार्य पदावरुन निवृत्त झाले होते. इंगळे यांना एकही मुलगा नसून पाच मुलीच आहेत. तरीही देखील इंगळे यांनी मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता आपल्या मुलींना चांगले शिक्षण दिले. इंगळे यांनी आपल्या १७ वर्षाच्या प्राचार्यपदाच्या कारर्कीद शिक्षण, खेळ यामध्ये आपले बहूमोल योगदान दिले होते. मृत्यूसमयी इंगळे ७७ वर्षाचे होते. ८ जून रोजी मोताळा येथील स्व. झंवर मुक्तिधामात भाऊसाहेब इंगळे यांच्या पार्थीवाला त्यांच्या तीन मुली वैशाली भोपळे, श्रीमती निकाळे आणि रजनी देशमुख यांनी अग्नी दिला.

X