विदर्भाला धक्का : / विदर्भाला धक्का : आयआयआयटी औरंगाबादमध्ये

Jun 21,2011 04:08:36 PM IST

नागपूर - विदर्भाचा दावा असलेले तंत्रज्ञान विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी (आयआयआयटी) अनुक्रमे पुणे आणि औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून विदर्भाच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्यात येणार असल्याचे दिसते.पुढील महिन्यात होणाऱया मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात येईल. गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठाचा निर्णय अद्याप अनिर्णित आहे.पुणे आणि औरंगाबादवर सरकार मेहेरबानसरकार आणि तंत्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांची माहितीनुसार, तंत्रज्ञान विद्यापीठा पुण्यामध्ये आणि आयआयआयटी औरंगाबादमध्ये स्थापन करण्यात येईल.आयआयआयटी प्रथम विदर्भातील अमरावतीमध्ये सुरु करण्याची योजना होती. मात्र तेथील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे ही संस्था औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही संस्था पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

गोंडवाना विद्यापीठ निर्मितीचा घोळ अजून मिटलेला नाही. हे विद्यापीठ केव्हा सुरु होणार याबद्दल अजून कोणताच निर्णय झालेला नाही. या विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या नावावरही शासनाने शिक्कामोर्तब केला नाही. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत मागवण्यात आलेल्या इच्छुकांच्या नावाची फाईल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात आहे. त्यांच्या स्वाक्षरीनंतरच कुलगुरुंच्या नावाची घोषणा होणार आहे.

मागील वर्षी वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी राज्यात सहा नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यातील एक चंद्रपूर जिल्ह्यात सुरु करण्याची त्यांची घोषणा होती. मात्र डॉ. गावितांनी आता शब्द फिरविला आहे, चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा अजून निर्णय झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर मुंबईत नव्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया सूरु झाली आहे.
दरम्यान राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. एस.के.महाजन यांनी सांगितले की, तंत्र शिक्षण विद्यापीठ पुण्यात तर '
आयआयआयटी' औरंगाबादमध्ये सुरु करण्याचा निर्णय शासन लवकरच जाहिर करेल. तसेच आम्हाला जसे आदेश येतील त्यानूसार आम्ही पुढील कार्यवाही करु असे त्यांनी सांगितले.X