विदर्भात मान्सूनचे आगमन / विदर्भात मान्सूनचे आगमन लांबले

टीम दिव्य मराठी

Jun 12,2011 12:19:17 PM IST

नागपूर - विदर्भात मान्सून किमान चार दिवसांसाठी लांबला आहे. मुंबईत कमी दाबाच्या पट्टयामुळे विदर्भात मान्सूनचे आगमन लांबले आहे.

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, नाशिक मध्ये मान्सूने हजेरी लावली आहे. मान्सूनची रेषा नाशिकनंतर मराठवाडयात सरकते त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भात मान्सूनचे आगमन होणे आपेक्षित होते मात्र नाशिकनंतर मान्सून रेषा आंध्र प्रदेशकडे वळली आहे त्यामुळे विदर्भ अजूनही तहानलेलाच आहे.

दरम्यान विदर्भातील तापमानात उष्मा कायम असून, शनिवारी सर्वाधिक 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल अकोला 40.2, वर्धा 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने दिवसभरात वाढलेल्या तापमानामुळे वादळी वा-यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.


X
COMMENT