Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | vitthal-temple-darshan

आषाढी एकादशीसाठच्‍या दर्शनाची वेळ यंदापासून वाढणार

team divya marathi | Update - Jun 15, 2011, 01:47 PM IST

आषाढी एकादशीला राज्यभरातून विठुमाऊलीच्‍या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. भाविकांच्‍या दर्शनाची वेळ वाढविण्‍याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यावर्षीपासून व्ही.आय. पी. दर्शन पासेसच्या संख्येत कपात करण्‍यात येणार आहे.

  • vitthal-temple-darshan

    आषाढी एकादशीला राज्यभरातून विठुमाऊलीच्‍या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. भाविकांच्‍या दर्शनाची वेळ वाढविण्‍याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यावर्षीपासून व्ही.आय. पी. दर्शन पासेसच्या संख्येत कपात करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे सर्वसामान्‍य भाविकांना दर्शनासाठी जास्‍त वेळ उपलब्‍ध होणार आहे. आषाढी एकादशीची शासकीय पूजा, दर्शन मंडप आणि मंदिर सफाईसाठी लागणाऱ्या वेळेतही कपात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी दिली. मंदिर समितीचे अध्यक्ष शशिकांत पागे यांनी राजीनामा दिल्यानंतर पदभार स्वीकारल्यावर जिल्हाधिकारी प्रथमच मंदिरात आले होते. भाविकांना दर्शन देण्यासाठी खास व्यवस्था केली जाणार असून दर्शन रांगेतील मंडपांची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण दर्शन रांगेवर निवारा करण्याची तयारी मंदिर प्रशासन करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Trending