आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा: महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाधी घेण्याचा साधूचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - महाकुंभात समाधी घेण्याचा प्रयत्न करणार्‍या एका साधूला शुक्रवारी रोखण्यात आले. महिलांवरील अत्याचार, गंगा नदीतील प्रदूषण याविषयी जनजागृती करण्यासाठी साधूने ही कृती करण्याचा प्रयत्न केला.

स्वामी शामानंद सरस्वती असे साधूचे नाव आहे. नऊ फूट रुंद आणि नऊ फूट खोल अशा खड्डय़ात ते समाधी घेणार होते. त्यासाठी खड्डय़ात चिखल करण्यात आला होता. त्यात ते झोपणारे होते. त्यानुसार शुक्रवारी पूजेनंतर त्यांनी खड्डय़ातील चिखलात प्रवेश केला. तेथे ते नऊ दिवस पडून रहाणार होते. त्यांच्या शरीरावर तीन फुटांच्या चिखलाचा थर लावण्यात येणार होता; परंतु पोलिसांनी ऐनवेळी रोखले.