आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Azam Khan Wrote Letter To The Prime Minister In Case Of Vip Bath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हीआयपी स्नानासंदर्भात आझम खान यांचे पंतप्रधानांना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - महाकुंभमेळ्यत वसंत पंचमीच्या दिवशी शाही स्नानासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाले. उच्च न्यायालयाने व्हीआयपी स्नानास बंदी घातली होती. त्यानंतरही सीमा सुरक्षा दलाचे(बीएसएफ) महासंचालक सुभाष जोशी यांनी व्हीआयपी स्नान केले. त्यानंतर लखनऊचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक नवनीत सिकेरा यांनी पवित्र स्नान केले. आता उत्तर प्रदेश सरकारने व्हीआयपी स्नान थांबवण्यासाठी थेट पंतप्रधानांना त्यात हस्तक्षेप करण्याची गळ घातली आहे.

उत्तर प्रदेशचे शहर विकासमंत्री व कुंभमेळा प्रभारी आझम खान यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. बीएसएएफच्या महासंचालकांनी कुंभक्षेत्रात वाहन घेऊन आतपर्यंत प्रवेश केला. त्यामळे राज्य सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर सिकेरा यांनीही कुटुंबासमवेत स्नान केल्याने वाहतूक, सुरक्षा व्यवस्था विस्कळीत झाली.

या संदर्भात आझम खान यांनी पत्र लिहून त्यांना यात लक्ष घालण्याची मागणी केली. सर्व व्हीआयपी, व्हीव्हीआयपींना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. तसेच कुंभमेळा परिसरात वाहन बंदी असतानाही अधिका-या च्या वाहनास परवानगी दिल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

असा आहे न्यायालयाचा आदेश
अलाहाबाद उच्च् न्यायालयाने गुरुवारी यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यात म्हटले आहे की, कुंभमेळा सुरू असताना त्या परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स व पोलिसांची वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी घालण्यात यावी.