आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात डुबकी लावण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत हे सेलिब्रेटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकरसंक्रांती 14 जानेवारी आणि पौष पूर्णिमा 27 जानेवारीला पार पडलेल्या शाही स्नानानंतर कुंभमेळा प्रशासन आगामी मुख्य स्नान पर्व 10, 15, 25 फेब्रुवारी व 10 मार्च 2013 या दिवशी लाखो श्रद्धाळू, पर्यटक, तसेच साधू-संताचे स्नान, स्वच्छता, सुरक्षा, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे.

कुंभ नगरात साधू-संत, श्रद्धाळू तसेच पर्यटकांची येण्याची संख्या वाढत आहे. व्हीआयपी व्यक्तींना तसेच बॉलिवूडमधील कलाकारांनी महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होऊ नये, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्टार मंडळी दाखल झाली तर त्यांच्यामुळे गर्दी वाढून चेंगराचेंगरीसारख्या जीवघेण्या घटना होऊ शकतात. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन बॉलिवूडमधील कलाकारांनी येण्याचे टाळले पाहिजे, असे विभागीय आयुक्त देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले. प्रोमोशनला इव्हेंट टाळण्याची सूचनाही त्यांच्याकडून करण्यात आली.

कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींवर एक नजर...