आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • EXCLUSIVE RARE Pictures Of Lady Naga Saints Mahakumbh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

200 महिला बनल्या नागा संन्यासी, पाहा EXCLUSIVE आणि RARE फोटोज्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभनगरी, अलाहाबाद- अलाहाबादमधील त्रिवेणी संगम किना-यावर महिला नागा संन्यासीची एक वेगळीच दुनिया आहे. आज सुमारे 200 महिला आपले श्राद्ध आणि पिंड दान करीत नागा संन्यासी बनल्या. सर्वांनी दिक्षा ग्रहण करीत नागा साधू बनण्याची प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. या किना-यावर आपले डोक्यावरील केसाचे मुंडण करुन या महिलांनी स्वत:चे पिंड दान केले.

तिर्थराज प्रयागमध्ये पवित्र संगमावरील वाळूत कुंभ मेळ्यात नव्या महिला नागा संन्यासी बनण्याची प्रक्रिया पार पडली. महिला नागा संन्यासींनी हवन पूजन करीत आपल्या 21 पिढ्यांचे पिंड दान केले. उर्वरित प्रक्रिया व तिथी पूर्ण करुन आज सायंकाळपर्यंत या महिला नागा संन्यासी आपापल्या अखाड्यात दाखल होतील.

तेथे अखाड्याच्या धर्म ध्वजाखाली पूजा व विधी करीत रात्रभर ओम नमः शिवाय चा जाप करतील. पहाटे चार वाजता अखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज सर्वांना संन्यासाची दीक्षा देतील.

पुढे पाहा, महिला नागा संन्यासींबाबत आणि त्यांच्या दीक्षेबाबत....