आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lack Of Fresh Blood Bares Naga Sadhus To Near Extinction

नागा साधूंची जमात संपण्याच्या मार्गावर; कुंभमेळ्यात दाखल झाले खोटे नागा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात शतकानुशतके असलेली साधूंची परंपरा 21 व्या शतकात धोक्यात आली आहे. अखाड्यात नागा साधू बनण्याची इच्छा असणा-यांची सख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. ही स्थिती फक्त अलाहाबादमध्ये नाही तर, हरिद्वार, नाशिक आणि उज्जेनमधील अखाड्यातही नागा साधू बनणा-यांची संख्या कमालीची घटली आहे. ही संख्या घटण्यामागे नागा साधूंचे खडतर जीवन जगणे, नागा साधू बनण्याची कठिण प्रक्रिया, ब्रह्मचर्याची परीक्षा व त्यासाठी लागणारी 12 वर्षांचा काळ असल्याचे सांगितले जात आहे.

नागा साधूंची अखाड़े चिंतित आहेत. तसेच हे अखाडे आपल्या नागा साधूंची संख्या दाखविण्यासाठी अनैतिक मार्ग स्वीकारत असल्याचे आढळून आले आहे. द्वारका पीठाचे प्रमुख स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अवी मुक्तेश्वरानंद यांनी यावर प्रकाश झोत टाकला आहे. ते म्हणाले, नागा साधूंची संख्या घटल्यामुळे दबावाच्या भीतीने अनेक अखाड्यांनी कुंभ मेळ्यासारख्या ठिकाणी आपले 'मान-पान' राहावे म्हणून खोटे नागा साधूं आपल्याबरोबर आणले आहेत. ते पुढे म्हणतात, 'नागा साधूंची संख्या कमालीची घटत चालली आहे. काळ बदलत चालला आहे आणि भक्तांच्याजवळ इतके धैर्य आणि धाडस राहिले नाही की, ते खडतर साधना करु शकतील.

आनंद अखाड्याचे सचिव स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले की, 'अखाड्याचे मूळ स्वरुपच आता बदलत चालले आहे. एकीकडे आपण नव्या भक्तांना व नागरिकांना आकर्षित करीत आहोत तर, दुसरीकडे नागा साधू बनणा-यांची संख्या घटत चालली आहे. सर्व अखाड़े नागा साधूंची आकडेवारी ठेवतात. त्यामुळे नागा साधूंची संख्या घटली किंवा वाढली तरी त्याची माहिती सहज मिळू शकते. नागा साधूंत विशेषत दिगंबर नागा साधूंची (निर्वस्त्र नागा साधू) संख्या झपाट्याने घटली आहे.


नागा साधूंबाबत आणखी वाचण्यासाठी पुढे क्लिक करा....