आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या कुंभमेळयात येणा-या लोकांची कशी केली जाते मोजणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्‍या महाकुंभमध्‍ये लाखो लोक स्‍नान करण्‍यासाठी येत आहेत. गंगा, यमुना आणि सरस्‍वतीच्‍या संगमात स्‍नान केल्‍याने सर्व पाप धुतले जातात असा विश्‍वास असलेले लोक 55 दिवस चालणा-या या महामेळयात सहभागी होत आहेत. त्‍यामुळेच इथे सुमारे दोन महिने लाखो लोकांचा मेळा लागलेला असतो. साधु-सन्‍यासी येथे राहतात. कुंभमेळा प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार इथे सुमारे 10 कोटी लोक येण्‍याची शक्‍यता आहे. पण एवढया मोठया प्रमाणात येणा-या लोकांची मोजणी कशी आणि कोणत्‍या आधारावर करायची हाच मोठा प्रश्‍न आहे.

या महामेळ्याची महामोजणी करण्‍याची जबाबदारी फक्‍त दोन लोकांच्‍या खाद्यांवरच आहे. हे दोन लोक आहेत, अलाहाबादचे आयुक्‍त देवेश चतुर्वेदी आणि अलाहाबाद शहराचे पोलिस महानिरीक्षक आलोक शर्मा. पहिल्‍या शाही स्‍नानात सुमारे 85 लाख लोकांनी स्‍नान केल्‍याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, आलोक शर्मा यांनी दिलेले आकडे खूप वेगळे असल्‍याचे दिसून आले आहे. शर्मा यांच्‍या माहितीनुसार, पहिल्‍या दिवशी फक्‍त 15 ते 18 लाख लोकांनी स्‍नान केले होते.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून कशी होते महा'मोजणी'...