आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Sight Of Devotion You Probably Have Not Seen Before Mahakumbh 2013

PHOTOS : कुंभमेळ्यातील भक्तीचा अनोखा संगम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहबादमध्ये सुरु असलेला कुंभमेळा साधू-संत आणि भक्तांनी चैतन्यमय झाला आहे. संगमावर संध्याकाळी करण्यात येणाऱ्या आरतीच्या दैदिप्यमान प्रकाशाने सर्व आसमंत उजळून निघत आहे. संगमावर या आरतीसाठी रोज हजारो भाविक हजेरी लावत आहेत. संगमावर स्नान केल्यानंतर आरतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. आरती न केल्यास संगम स्नानाचे पूर्ण पुण्य मिळत नाही असे मानले जाते.

संगमावर दररोज हरिहर समाजाद्वारे विशेष आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्यावेळी श्रद्धाळू पूजा-आराधना, मंत्रोच्चारांनी गंगेच्या महिमेचे गुणगान करून मोक्ष प्राप्तीसाठी प्रार्थना करतात.

दररोज सूर्यास्तानंतर या विशेष आरतीचे आयोजन फक्त कुंभमेळ्यातच नाही, तर गंगा मोहत्सव व गंगा दशहाराच्या दिवशी केले जाते.
पाहा कुंभमेळ्यातील भक्तीचा अनोखा संगम...