आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर कुंभनगरीत आज तिसरे व अखेरचे शाही स्नान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभनगरी, अलाहाबाद- महाकुंभमध्ये आज वसंत पंचमीदिवशी महत्त्वाचे असे तिसरे शाही स्नान होत आहे. सगळ्यात मोठा अखाडा जूना अखाड्याच्या स्नानावेळी दिल्लीतील सोनेवाले बाबा बिट्टू भगत ऊर्फ गोल्डन बाबा आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. ग्लॅमरस परदेशी मॉडेलांसोबत आणि सोन्याचे दागिने घालून बाबांनी आपल्या देशी-परदेशी भक्तांसोबत हर-हर महादेवचा जयघोश करीत शाही स्नान केले.

शुक्रवारी सकाळी 6.15 वाजता महानिर्वाणी आणि अटल अखाड्याच्या मिरवणूकीने शाही स्नानाला सुरुवात झाली. या शाही स्नानमध्ये सुमारे दोन कोटी भाविक सहभाही होतील, असे सांगितले जात आहे. मात्र आजच्या शाही स्नानावर मौनी अमावस्याच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीची छाया स्पष्टपणे दिसून येत होती. अखाड्याचे साधू-संत भक्तीभावाने स्नान करीत आहेत. अलाहाबादचे पोलिस आयुक्त देवेश चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरापर्यंत 40 लाख भाविकांनी स्नान केले. सर्व 13 अखाड्यांनी मिरवणूक काढली असून, संगमावर शाही स्नान सुरु आहे. महानिर्वाणी, अटल, निरंजनी, आनंद, जूना आणि बैरागी अखाड्याचे संगमात स्नान झाले.

या शाही स्नानाच्या वेळी टिपलेली छायाचित्रे पाहण्यासाठी पुढे क्लिक करा....