आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाखोंच्या उपस्थितीत तिसरे स्नान पार पाडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी अलाहाबादेत तिसरे आणि शेवटचे शाही स्नान उत्साहात पार पडले. लाखो भाविकांनी या पर्वणीवर पवित्र स्नान केले. परंतु कुंभमेळा परिसरात आग लागल्याने एका साधूचा मृत्यू झाल्याच्या घटनेने कुंभमेळ्याला आणखी एका दुर्घटनेचे गालबोट लागले.

गेल्यावेळी स्नानाच्यावेळी चेंगराचेंगरी होऊन 36 लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शाही स्नानाच्यावेळी कुंभमेळ्यात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. 25 हजारावर पोलिस व सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते. शाही स्नानास घाटावर जाण्यासाठी अनेक किलोमीटरच्या पायी रांगा लागल्या होत्या. या परिसरात किरकोळ पाऊस झाला. याच वातावरणात प्रमुख आखाडे व नागा साधूंनी शाही स्नान केले. नागा साधूंची मिरवणूक यावेळी कुठल्याही वाद्याविना काढण्याचा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेने घेतला होता. त्यानुसार नागा साधूंनी बँडपथक न घेता मिरवणूक काढली. 10 फेब्रुवारीला अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे आखाडा परिषदेने सवाद्य मिरवणूक रद्द केली होती.