आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swami Nityananda Sex Scandal Became Mahamandleshwar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : सेक्स स्कॅंडलफेम स्वामी नित्यानंदला कुंभमेळ्यात दिली महामंडलेश्वरची पदवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभनगरी, अलाहाबाद- सेक्स स्कॅंडलप्रकरणात जेलची हवा खावी लागलेल्या स्वामी नित्यानंदला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आहे. स्वामीला महानिर्वाणी अखाड्याची महंत ही पदवी प्रदान केली, आता स्वामीसाठी शाही मिरवणूक होणार आहे. वसंत पंचमीच्या शाही स्नान मुहूर्तावर महानिर्वाणी अखाड्याच्या महामंडलेश्वरांसोबत स्वामी डुबकी घेतील.

वादग्रस्त स्वामीला अखाड्याची मंहामंडलेश्वर पदवी दिल्यास वाद होईल, म्हणून अखाड्याने काल सायंकाळी गुपचुप पद्धतीने नित्यानंदचा पट्टाभिषेक केला. एखाद्याला महामंडलेश्वरची पदवी देण्याअगोदर सर्व अखाड्यांना व संतांना आमंत्रण दिले जाते मात्र स्वामीच्या वेळी तसे करण्यात आले नाही. अखाड्याने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत हा आमचा खासगी प्रश्न असून, यात लक्ष घालू नये असे म्हटले आहे. तसेच स्वामीचे प्रकरण अद्याप कोर्टात असून, त्यामुळे आता त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. दक्षिण भारतातील एखाद्या संताला महामंडलेश्वरची पदवी देण्याची ही पहिलीच घटना आहे.

दरम्यान, नित्यानंदला दिलेल्या महामंडलेश्वर पदवीला निरंजनी अखाड्याने विरोध केला आहे. अखाड्याचे सचिव नरेंद्र गिरीच्या म्हणण्यानुसार, एखाद्या वादग्रस्त संन्यासीला गुपचुप पद्धतीने महामंडलेश्वर पदवी देणे धर्माच्या विरोधात आहे. महामंडलेश्वराची पदवी देताना सर्व अखाड्यांना व संतांना बोलावले जाते. ते सर्व जण त्या व्यक्तीवर चादर उडवून पदवी देत असल्याचे जाहीर बोलतात. मात्र येथे तसे झाल्याने स्वामीला दिलेली महामंडलेश्वराची पदवी अवैध ठरते.