आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 88th Marathi Sahitya Samelan Inauguration At Ghuman News In Marathi

PHOTO: घुमान साहित्य संमेलन: \'नेमाडेंचे साहित्य म्हणजे मराठीचा खजिना\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका करणारे 'ज्ञानपीठ' पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद नेमाडे यांचे साहित्य म्हणजे मराठी वाड्‍मयातील खजिना असल्याचे गौरवोद्‍गार राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. घुमान येथे साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनाप्रसंगी पवारांनी संबोधित केले.

पवार म्हणाले की, यंदाचे मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये होत असल्याचा आनंद होत आहे. 'कोसला'कार भालचंद्र नेमाडेंचे साहित्य म्हणजे मराठी साहित्याचा खजिना असल्याचे सांगत शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला.

मात्र, मुंबई, पुणे, नागपुरात मराठी टक्का घसरत असल्याची खंत देखील पवार यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी ही ज्ञान भाषेसह विज्ञान भाषा होणे गरजेचे आहे.

तत्पूर्वी संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे 88 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज (शुक्रवारी) मोठ्या थाटात प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन झाले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दरम्यान, विद्यमान संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी प्रास्ताविक मांडून संमेलनाध्यक्ष पदाची सूत्रे सदानंद मोरे यांच्याकडे सोपवली.
संत नामदेवांची प्रेरणा प्रांत, धर्माच्या पलिकडची आहे. तसेच पंजाब आणि महाराष्‍ट्राचे नाते फार जुने असल्याचे संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. धर्मनिरपेक्ष राजकारण सगळ्यात आधी मराठ्यांनी सांगितले होते. तसेच संमेलनच्या ठिकाणावरून चर्चा अनाठायी असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. संमेलनासाठी देशात घुमानसारखे दुसरे ठिकाण नव्हते, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थान ही सगळ्यांची भूमी आधी मराठ्यांची असल्याचे सांगत धर्मनिरक्षेप राजकारण मराठ्यांनी आधी सांगितले पंजाब हा महाराष्‍ट्राचे आणि महाराष्ट्र हा पंजाबचे रक्षण करतोय. कारण दोन्ही राज्यात ऐतिहासिक नाते आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संमेलनाच्या उद्‍घाटनाचे फोटो...