आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 88th Marathi Sahitya Samelan Inauguration At Ghuman News In Marathi

घुमानसारखे दुसरे ठिकाण नाही, वाचा सदानंद मोरे यांचे अध्यक्षीय भाषण जसेच्या तसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान - संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे 88 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज (शुक्रवारी) प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या उपस्थितीत संमेलनाचे थाटात उद‌्घाटन झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यमान संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सोपवली. सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संत नामदेवांची प्रेरणा प्रांत, धर्माच्या पलिकडची आहे. तसेच पंजाब आणि महाराष्‍ट्राचे नाते फार जुने आहे. धर्मनिरपेक्ष राजकारण सगळ्यात आधी मराठ्यांनी केले. तसेच संमेलनच्या ठिकाणावरून चर्चा अनाठायी असल्याचेही मोरे यांनी यावेळी सांगितले. संमेलनासाठी देशात घुमानसारखे दुसरे ठिकाण नव्हते, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान ही सगळ्यांची भूमी आधी मराठ्यांची असल्याचे सांगत धर्मनिरक्षेप राजकारण मराठ्यांनी आधी सांगितले पंजाब हा महाराष्‍ट्राचे आणि महाराष्ट्र हा पंजाबचे रक्षण करतोय. कारण दोन्ही राज्यात ऐतिहासिक नाते आहे.

यंदाच्या संमेलनाचे वैशिष्ट्ये म्‍हणजे संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांच्या भाषणाचे ब्रेल लिपीमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे अंध साहित्यप्रेमींनाही संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचे लिखित स्वरुपात जतन करता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांचे अध्यक्षीय भाषण जसेच्या तसे...