आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 88th Marathi Sahitya Samelan Inauguration At Ghuman News In Marathi. Read More News In Marathi

मराठमोळ्या महिला आणि वारकरी पेहरावातील साहित्यप्रेमींनी वेधले लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान- संत नामदेव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंजाबमधील घुमानमध्ये आजपासून (शुक्रवार) 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनी विद्यमान संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्याकडून संमेलनाध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारली.

महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ढोलताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. नऊवारी साडीतील मराठमोळ्या महिला आणि वारकरी पेहरावातील साहित्यप्रेमी आणि प्रत्येकांच्या हातात भगवे ध्वज या ग्रंथदिंडीचे आकर्षण होते. पुस्तकांचे वाचन वाढवण्यासाठीचे संदेश त्यांनी दिले जात आहे. ग्रंथदिंडीत अनेक नामवंत साहित्यिक, मान्यवर सहभागी झाले होते.

पंजाबी प्रांतात वंदनीय असलेल्या संत नामदेवांच्या नगरीत वास्तव्य करणारे घुमानवासीय मराठी भाषेच्या उत्सवासाठी उत्सूक दिसले. पुरुष-महिलांनी ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येन सहभाग घेतला. मराठमोळ्या सर्व घुमानवासीय या संमेलनाविषयी कुतूहलपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे फोटो...