आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 89th Marathi Literary Meet At Pimpri Chinchwad, Gulzar Shayari

देशातील सर्व भाषांचे संयुक्त संमेलन महाराष्ट्रात व्हावे- गुलजार यांची अपेक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड- भारतात अनेक भाषा आहेत. भाषांचे वेगवेगळे साहित्य महोत्सवही भरविले जातात. मात्र, या सर्व भाषांचे मिळून एक संयुक्त संमेलन व्हावे. या संमेलनात विविध भाषांतील तज्ञ, साहित्यिक, वक्ते यांनी आपले विचार मांडावेत आणि यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि गीतकार गुलजार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. दरम्यान, तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने पुस्तके उदास झाल्याची खंत गुलजार यांनी मुलाखतीत व्यक्त केली.
89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गुलजार म्हणाले, यापूर्वी मी एकदा मराठी साहित्य संमेलनाला हजर राहिलो आहे. त्यावेळी साधारणपणे पन्नास हजार रसिक उपस्थित होते. आपल्या मातृभाषेवर प्रेम करणारे हे लाखभर रसिक पाहून मी थक्क झालो. भारतात खूप भाषा आहेत. पण त्या भाषांमध्ये भरणारे अशा प्रकारचे संपन्न आणि वैभवशाली संमेलन मी पाहिले नाही. मातृभाषेचे प्रेम काय असते, हे मी येथे अनुभवतो आहे. आपला देश हा विविधरंगी भाषांनी समृद्ध आहे. त्या त्या भाषांमध्ये साहित्य महोत्सव भरविले जातात. पण, या सर्व भाषांचे मिळून एक संयुक्त साहित्य संमेलन देशात व्हावे, ही माझी इच्छा आहे. यासाठी मी बनारसला प्रयत्नही केला. आजही माझी ही इच्छा अपुरी आहे. हे संमेलन पाहता महाराष्ट्राने यासाठी पुढाकार घ्यावा, असे वाटते. देशात बालसाहित्याची वानवा आहे. समृद्ध असे बालसाहित्य आपल्याकडे नाही. हिंदीतही पाश्चिमात्यांचे भाषांतर केलेले साहित्य आहे.
कालिदास का नाही?
मला इंग्रजीशी वैर नाही. पण, शेक्सपिअर, मिल्टन शिकवत असताना कालिदासाकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. ते आपल्याकडे शिकविले जात नाही. आपल्या मुळांशी घट्ट राहणे आवश्यक असते. मराठी साहित्याचे अनेक भाषांत भाषांतर होते. मात्र, मराठीत इतर भाषेतून काही येतेय का, हे पाहायला हवे.
गुलजार यांची मुलाखत अंबरीश मिश्र यांनी घेतली. गुलजार यांना या मुलाखतीतून बोलते केले. उत्तरोत्तर ही मुलाखत रंगत गेली... वाचा पुढे काय म्हणाले गुजजार आणि वाचा त्यांची शायरी...