आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अभिजात दर्जा’चे दोन्ही मुहूर्त चुकले.....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान, पंजाब - मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाल्याची घोषणा ज्या मुहूर्तावर होईल, अशी अपेक्षा रसिकांना होती, ते दोन्ही मुहूर्त अखेर चुकले, अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली. विनोद तावडे यांना यासंबंधी विचारले असता तावडे म्हणाले, "देशातील कुठल्याही भाषेला ‘अभिजात भाषा’ असा दर्जा जेव्हा जाहीर केला जातो, तेव्हा केंद्राकडून विशिष्ट रक्कम त्या भाषेच्या विकासासाठी दिली जाते. ही रक्कम ८० कोटी इतकी मोठी असल्याने केंद्रीय अर्थमंत्रालयासह वित्त विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालय अशा ठिकाणी संबंधित फाइल फिरत असल्याची माहिती आहे.

‘अभिजात दर्जा’ची अन्य सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अर्थ विभागाकडून फाइल क्लीअर होण्याची प्रतीक्षा आहे.' तत्पूर्वी मराठीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाल्याची घोषणा २७ मार्चला ‘मराठी भाषादिनी’ किंवा संमेलनात केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र संमेलनाचा रविवार (५ एप्रिल) हा अखेरचा दिवस असल्याने ती शक्यता आता मावळली आहे.

प्रक्षेपणाचे वाद नव्हते
संमेलन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन तसेच आकाशवाणीवर मोफत करावे, अशी अपेक्षा महामंडळ पदाधिकार्‍यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. त्यावर ‘फुकटेगिरी बंद करा’ अशा शब्दांत तावडे यांनी टीका केली होती. त्याविषयी तावडे यांनी घुमानला सारवासारव केली. ‘प्रक्षेपणाविषयीचे नियोजन केले जावे, इतकेच मला म्हणायचे होते.

गडकरींविरोधात सूर
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंजाबी साहित्य संमेलन नागपूर येथे घेऊ, असे जाहीर केले होते. त्यावर वेगळा सूर लावत तावडे म्हणाले, "अन्य भाषिक संमेलन जरूर व्हावे, पण ते नागपूरसह नांदेड वा हिंगोली (संत नामदेवांचे जन्मस्थान) येथेही होऊ शकते. ते घेण्यापूर्वी पंजाबी बांधवांची इच्छा विचारात घेतली जाईल आणि मगच स्थळ निश्चित केले जाईल.'