आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमधील गुंतवणूकदारांनाही केले आकर्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान, पंजाब - घुमान येथील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यात गुंतवणुकीसाठी पंजाबमधील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने घुमानमध्ये मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्रचा नारा देणारी पत्रके वाटली आहेत. नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाचा नारा देत जगभरातील गुंतवणूकदारांना भारतात आकर्षित करण्यासाठी आवतण पाठवले. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही मेक इन महाराष्ट्रचा नारा देत पंजाबमधील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मेक इन महाराष्ट्राचा नारा दिला आहे. पंजाबमध्ये होणार्‍या घुमान येथील साहित्य संमेलनात महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक ब्राउशर वाटण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रात उद्योजकांना मिळणार्‍या उद्योगाच्या संधींबाबत माहिती देण्यात येत आहे. महाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे चांगले वातावरण आहे. येथील शेतीपूरक व्यवसायाला सरकार कसे महत्त्व देते, अशी माहिती याद्वारे देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात उद्योजकांना कशा प्रकारच्या व्यवस्था पुरवल्या आहेत, याची माहितीही देण्यात आली आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची निधन झालेल्यांना श्रद्धांजली
घुमान अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला आलेल्या ज्येष्ठ रसिकांपैकी अरविंद कुलकर्णी (वय ७६) व कृष्णाजी अंबटकर (वय ६४) या दोघांचा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू झाला. त्यांच्या निधनाबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शनिवारी (ता.४) भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्याने दिली आहे. पाठविलेल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, त्यांचा दु:खद अचानक झालेला मृत्यू धक्कादायक असून आपण अशाप्रसंगी धैर्य दाखवणार्‍या त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात पूर्णपणे सहभागी असून परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.