आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Femous Poet Salima Hasmi In Ghuman Sahitya Samelan

साहित्य संमेलन : सध्याच्या युवा पिढीसमोरचांगले रोल मॉडेल हवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान, पंजाब - पाकिस्तानमधील सध्याची युवा पिढी मला वेगळी वाटते. ती स्वत:च्या पायावर ठाम उभे राहण्यासाठी धडपडते आहे. बुद्धी आणि प्रयत्नांत ती कमी नाही, फक्त त्यांच्यासमोर चांगले रोल मॉडेल सतत असण्याची गरज आहे. ते देणे ही आपली जबाबदारी आहे. ‘आयसिस’ने जगभरातील तरुणांसमोर असे मॉडेल उभे केले आहे.
मग ते चांगले की वाईट, हा पुढचा मुद्दा आहे, पण त्या मॉडेलमुळे युवावर्ग त्याकडे आकर्षित होत आहे, असे मनोगत लाहोर येथील प्रसिद्ध कवयित्री सलीमा हाश्मी यांनी येथे ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. घुमान साहित्य संमेलनात शनिवारी सलीमा यांचा विशेष सत्कार साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर त्या ‘दिव्य मराठी’शी बोलत होत्या. ‘युवा पिढीकडून मला व्यक्तिश: खूप आशा वाटतात. ही पिढी काही तरी चांगले करू पाहते आहे,’ असे त्या म्हणाल्या.
भारत-पाक संबंधांविषयी भाष्य करण्याचे सलीमा यांनी टाळले, आपल्या दोन्ही देशांत राजकीय आणि लष्करी पातळ्यांवर संबंध तणावाचे असले तरी परस्परांतील संवाद सतत सुरू राहायला हवा कारण संवादामुळेच सकारात्मक, चांगले घडण्याच्या संधी निर्माण होतात, असे सलीमा म्हणाल्या.
मलाला युसूफझाईला नोबेल पुरस्कार मिळाल्यावर आम्ही विद्यापीठांत जल्लोष केला. ‘मलाला डे’ साजरा केला; पण काही माध्यमे मात्र सतत नकारात्मक बाजू दाखवत राहतात. त्यामुळे जगासमोर तसेच चित्र उभे राहते. जे चुकीचे वा वाईट आहे, ते दाखवाच, पण त्याबरोबरीने जे काही चांगले घडते आहे, त्यालाही स्थान मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पाकमधील माध्यमांचा समाचार घेताना त्या म्हणाल्या, ‘माध्यमे सतत दबावाखाली असतात, हे मान्य केले तरी चौकटीत राहूनही चौकटीबाहेर पडता येते, हे समजून घेतले पाहिजे. उथळ, वरवरचे, सवंग आणि भडक चित्रण माध्यमे सतत दाखवत राहतात, अशी प्रतिक्रिया सलीमा यांनी दिली.