आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghuman Sahitya Sammelan In Breakfast Sabudana Wada

हनुमान भक्तांसाठी घुमानमध्ये साबुदाणे वडे, भोजनात पंजाबी-महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतनामदेव नगरी, घुमान, पंजाब - येथे सुुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आलेल्या साहित्य रसिकांची बडदास्त ठेवण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शनिवारी हनुमान जयंती असल्याने आलेल्या पाहुण्यांसाठी नाश्त्यात खास साबुदाणा वड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवारी हनुमान जयंती असल्याने अनेकांना उपवास असणार हे लक्षात घेता आयोजकांनी नाश्त्यासाठी खास व्यवस्था केली आहे. उपवास असणाऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून सकाळीच गरम गरम साबुदाना वडे आणि सोबत चटणी असा नाश्त्याचा आस्वाद साहित्य रसिक आणि उपस्थितांना मिळत आहे. त्याचबरोबर नाश्त्यामध्ये इडली सांबरचाही समावेश आहे.
जेवणाच्या मेनुचा विचार करता त्यात पंजाबी आणि महाराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.