आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghuman Special Railway Sahitya Sammelan President Hari Narke

घुमान विशेष रेल्वेत रसिकांनी भरवले \'धावते संमेलन\', अध्यक्ष नरके, नायगावकर उदघाटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशेष रेल्वेतून - पंजाबमधी लघुमान या छोट्याशा गावात सुमारे तीन हजारांहून अधिक मराठी साहित्यप्रेमींनी नुकताच तीनदिवसीय साहित्य संमेलनाचा आनंद लुटला असला तरी त्यांच्यातील संमेलनाचा ‘फीव्हर’ अजून कमी झालेला नाही. त्याची प्रचिती घुमानहून पुण्याकडे विशेष रेल्वेने निघालेल्या साहित्यप्रेमींनी मंगळवारी दिली. परतीच्या प्रवासात या मंडळींनी चक्क रेल्वेतच एक दिवसाचे धावते संमेलनच भरवले हाेते. या संमेलनात प्रसिद्ध विनोदी कवी अशोक नायगावकर यांचा सहभागही उल्लेखनीय ठरला.

पुण्याहून विशेष रेल्वेने निघालेल्या सुमारे ७०० साहित्यप्रेमींना प्रवासात घुमानकडे जाताना जेवढा त्रास झाला, तेवढाच किंबहुना त्याहून अधिक त्रास परतीच्या प्रवासातही सोमवारी सहन करावा लागला. मंगळवारी मात्र या कटू अनुभवांना तिलांजली देत रेल्वेतील काही मान्यवर साहित्यिक रसिकांनी एक छोटेसे धावते संमेलनच घडवून आणले. यात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, कवितावाचन, कथाकथन यासारख्या अनेक कार्यक्रमांची पर्वणी हाेती. या संमेलनात रेल्वेतील सर्वच रसिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

प्रवासाचा शीण घालवण्यासाठी आठवडाभराच्या यात्रेचा सुखद समारोप करण्याच्या दृष्टीने आयोजित या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक हरी नरके यांनी भूषवले. तर प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. मराठी भाषेचे गाढे अभ्यासक वसंतराव गाडगीळ यांची विशेष उपस्थिती होती.

पुस्तक विकत घेऊन उद‌्घाटन
अशोकनायगावकर, अध्यक्ष हरी नरके आणि वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद‌्घाटन झाले. या मान्यवरांनी पुस्तके विकत घेऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद‌्घाटन केले.

असे झाले संमेलन
- ग्रंथदिंडीने सुरुवात झाली.
- एका डब्यात ग्रंथप्रदर्शन.
- काही छोट्या प्रकाशकांनी या प्रदर्शनात स्टॉल लावले
- हौशी साहित्यिकांकडून काव्यवाचन, कथाकथन सादर करण्यात आले.

नायगाव‘करी’चा आस्वाद
यारेल्वेतील रसिकांना कवी अशाेक नायगावकर यांचा सहभाग लाभला. वारकरी संप्रदायात ज्या पद्धतीने हरिपाठ सादर केला जातो, त्याच धर्तीवर नायगावकरांनी उत्स्फूर्तपणे मायमराठीचा एक पाठच सादर केला. आपल्याला ज्या मायबोली मराठीची शिदोरी मिळालेली आहे, तिचे जतन करण्याचा उपदेश या माध्यमातून त्यांनी केला.

जसा वारकर्‍यांचा हरीपाठ असतो तसा हा मराठीचा पाठ असे नायगावकर म्हणाले
मराठीच्याद्वारी कारे क्षणभरी
लाज वाटे माऊलीची..
दारावर पाटी मराठीत लावू
भाजीपाला घेऊ मराठीत
सर्वत्र स्वाक्षरी मराठीत करू
घरीदारी बोलू मराठीत
नाक्या नाक्यावर मिळावी भाकर
सुटावा पापुद्रा मराठीचा
आठवारे मांडे आणि गुळवणी
माऊलीची पाठ लाल झाली
रुळो ओवी आता आमुच्या ओठात
होवोनी अभंग मात करू
सातशे वर्षांचा द्या रे इतिहास
माऊलीस आम्ही काय सांगू
ज्ञानराज स्फुंदे समाधी आतून
परभाषा मुळी गळा आली
बर्‍या बोलाने गा बोला मराठीत
तुकयाचे हाती सोटा आहे...
मराठीच्या द्वारी कारे क्षणभरी
लाज वाटे कारे माऊलीची....
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घुमान विशेष रेल्वेतील 'धावते संमेलन'