आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : पंजाबच्या लोकोत्सवात ओसंडला उत्साह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरी, घुमान - येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्््घाटन शुक्रवार, ४ रोजी झाले. या संमेलनात मराठी आणि पंजाबी भाषकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. संपूर्ण घुमानमध्ये उत्सवी वातावरण आहे.

अनेक दृष्टीने हे संमेलन ऐतिहासिक ठरले आहे. पंजाब सरकारने सुमारे दीड कोटी या संमेलनावर खर्च करून उत्तम व्यवस्था केली. पंजाबी माणसाच्या आतिथ्यशीलतेचे दर्शनही या निमित्ताने झाले.
अमृतसर ते घुमान हा सुमारे ५४ कि.मी.चा रस्ता एकदम चकाचक करण्यात आला. या रस्त्याच्या दुतर्फा गहू व सरसोची हिरवीगार शेते आणि वृक्षराजी असल्याने मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात घुमानमध्ये प्रवेश होतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला पाच मिनिटे आधीच आले. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे भाषण रटाळ आणि कंटाळवाणे झाले. ते थांबावे म्हणून रसिकांनी वारंवार टाळ्या वाजवल्या. कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने होते, त्या नंतर पाहुण्यांचे स्वागत केले जाते.

ट्रेन लेट, कार्यक्रमही लेट : नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, १० वाजता ग्रंथदिंडी होती. मात्र नागपूर आणि मुंबईडून येणाऱ्या रेल्वेगाड्या खूप उशिरा आल्याने सकाळचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे ग्रंथदिंडी दुपारी २ वाजता निघाली.