आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mararthi Literary Meet Special Train 12 Hours Late

घुमान विशेष रेल्वे तब्बल 12 तास लेट, साहित्य संमेलनातील कार्यक्रम पुढे ढकलेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान विशेष रेल्वेतून (लुधियाना) - घुमान विशेष रेल्वेला उशिर आणि सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे ग्रंथदिंडी आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे, मात्र 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन नियोजित वेळी होणार आहे.

घुमान येथे होऊ घातलेले 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काही नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. मुंबई- पुणे येथून निघालेली साहित्य संमेलन विशेष रेल्वेला उशिर झाल्यामुळे ध्वजारोहण आणि ग्रंथदिंडी दुपारी दोन वाजता होणार आहे. तर उद्घाटनाचा कार्यक्रम नियोजीत वेळेवर अर्थात चार वाजता होणार आहे. आज (शुक्रवार) सकाळपासून घुमानमध्ये पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यासोबतच रेल्वे पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे संयोजकांनी ध्वजारोहण आणि ग्रंथदिंडी हे कार्यक्रम पुढे ढकलले असल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी सांगितले आहे.

तब्बल 12 तास लेट
मुंबईहून घुमानकडे निघालेल्या रेल्वेची बियास रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची नियोजित वेळ रात्री साडेअकराची होती. घुमान पासून हे रेल्वेस्थानक जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र रेल्वे तब्बल 12 तासाहून अधिक उशीराने धावत आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत रेल्वे
लुधियाना रेल्वे स्थानकावरच होती. त्यामुळे घुमानला पोहोचण्यास किमान 12 वाजणार अशी शक्यता आहे. रेल्वेत सुमारे हजाराहून अधिक साहित्यप्रेमी आणि ग्रंथदिंडीत सहभागी होणारे प्रमुख कलाकार आणि ग्रंथदिंडीचे साहित्य असल्याने ही रेल्वे पोहोचेपर्यंत कार्यक्रमांना सुरुवात होऊ शकत नसल्याने आयोजकांनी ऐनवेळी ग्रंथदिंडी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दुपारी दोननंतर सुरू होणार कार्यक्रम
साहित्य महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजता ग्रंथदिडी निघेल आणि चार वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. नियोजित वेळेनुसार सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होणार होते. दरम्यान घुमान येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सत्रांनी कळवले आहे.