आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: घुमानच्या रेल्वेत साहित्यप्रेमींसाठी शब्दकोडे स्पर्धा, फिरते वाचनालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशी/घुमान स्पेशल रेल्वेतून - घुमानला चाललेल्या रेल्वेचा प्रवास सुमारे दोन दिवसांचा आहे. त्यात बुधवारी रेल्वेला झालेल्या विलंबामुळे या रेल्वेत घुमानवारी करणा-यांना कंटाळा येत चालल्याचे चित्र दिसू लागले होते. पण आयोजकांनी रेल्वेतही या साहित्य प्रेमींना कांटाळा येऊ नये याची खबरदारी घेतली आहे. रेल्वेत फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून विविध साहित्यिकांची पुस्तके वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. तसेच शब्दकोडे स्पर्धा घेण्यात येत आहे.
रेल्वेत फिरते वाचनालय
बुधवारी सुरू झालेल्या प्रवासाला उशीर झाल्याने साहित्य रसिकांमध्ये चांगलीच नाराजी होती. पण हळूहळू रेल्वेने वेग धरला आणि सकाळपासूनचा थकवा कमी झाला त्यानंतर रेल्वेतील साहित्य यात्रींचा उत्साह वाढला. त्यात हा प्रवास फार कंटाळवाणा होऊ नये याची खबरदारी आयोजक आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष भरत देसलडा यांनी घेतली आहे. साहित्य प्रेमींसाठी फिरते वाचनालय रेल्वेत उपलब्ध करून दिले आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध मराठी साहित्यिकांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात अनेक नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांचा आस्वाद साहित्य रसिक घेत आहेत.
शब्दकोडी स्पर्धा
रेल्वेमध्ये असलेल्या सर्वांसाठी शब्दकोडे सोडवण्याची स्पर्धा घेण्यात आली. साहित्यावर आधारीत शब्दकोडे तयार करून रेल्वेत सर्वांना वाटप करण्यात आले. ते सोडवण्यासाठी एक तासांचा वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.