आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Poet Ashok Naigaonkar In Ghuman Sahitya Railway

घुमान रेल्वेतून : नायगावकर म्हणाले, ...असा परफ्युम तयार करता येईल का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान स्पेशल रेल्वेतून - पुण्याहून साहित्यरसिकांना घेऊन घुमानकडे निघालेली रेल्वे तब्बल पाच तास उशीराने निघाली. त्यात ठिकठिकाणी तास-तासभर रेल्वे थांबत होती. त्यामुळे सुमारे हजाराहून अधिक रसिक असलेल्या संपूर्ण रेल्वेमध्येच मरगळ पसरली होती. पण प्रख्यात कवी अशोक नायगावकरांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत सुमारे तासभर विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली, गप्पा मारल्या आणि वातावरण पूर्णपणे बदलून गेले.

रेल्वेमध्ये दोन डबे साहित्यिकांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये नायगावकर आणि हरि नरके वगळता फारसे चर्चेतील चेहरे नव्हतेच. त्यातही राखीव असलेल्या एसी डब्यात साहित्यिकांची सोय असल्याने साहित्य रसिक आणि या साहित्यिकांची गाठभेटही झाली नाही. पण दिवसभराच्या थकव्यानंतर अशोक नायगावकरांचे एक सहकारी त्यांना घेऊन साहित्य रसिकांच्या बोगीत घेऊन आले. मग हळू-हळू आजुबाजूचे सर्वच या चर्चेत सहभागी झाले. नायगावकरांनी त्यांच्या खुमासदार शैलीत विविध विषयावर त्यांची मते मांडली. त्यानंतर संपूर्ण डब्यातील वातावरणच बदलून गेले.
आपण जगणेच विसरलो आहोत
कोण काय म्हणेल या भितीने आपण जणू जगणेच विसरलो आहोत. एवढंच काय घरात एकमेकांशी संवादही बंद होत आहे. घरात जेवण करतानाही एकमेकांशी बोलत नाही. रडताना हसतानाही मोकळेपणाने भावना मांडणे आपण विसरले आहोत. ओक्साबोक्शी रडायची तर आपल्याला लाज वाटू लागली आहे, असे जगून कसे चालेल असे नायगावकर म्हणाले.
असा परमफ्युम बनवून दाखवा म्हणा...
चर्चा सुरू असतानाच बाहेरून मातीचा गंध आला आणि नायगावकरांनी लगेच खास त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया दिली, आहाहा, काय सुगंध आहे, असा परफ्युम तयार करून दाखवा म्हणा. याची सर येईल का कशाला? असे बोलताच सगळ्यांनीच त्यांना दाद दिली.
जगण्याशी ज्याचा संबंध त्याचा कवितेशी
कविता काही कोणाची मक्तेदारी नाही. मराठीमध्ये पदवी मिळवली किंवा शिक्षण घेतले म्हणून त्याचा मराठीवर हक्क होत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जगण्याशी ज्याचा संबंध त्याचा कवितेशी संबंध मग त्याला लिहिता वाचता येते किंवा नाही या बाबीही गौण असल्याचे नायगावकर म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कविता म्हणणे टाळले...