आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : पंजाब प्रशासनाची निष्ठा, श्रद्धा आणि मराठी राजकारण्यांची चमकोगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान - संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय मंडळींचा भरणा नको किंवा राजकीय मंडळीचीच संख्या साहित्यिकांपेक्षा अधिक, हे मुद्दे गेल्या काही वर्षांपासून संमेलनाच्या संदर्भात कायमच चर्चेचे ठरत आले आहेत. हे वर्षही त्याला अपवाद नाही. शिवाय संमेलनाच्या उद्््घाटनाला शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, विनोद तावडे यांच्यासह अनेक ‘राजकीय’ मंडळींची उपस्थिती निदान निमंत्रणपत्रिकेवर तरी दिसते आहे.
या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारमधील मंत्री आणि अनेक प्रशासकीय अधिकारी मात्र अमृतसर आणि घुमानच्या वाऱ्या निष्ठेने करताना दिसत आहेत. फरक इतकाच, की आपली राजकीय मंडळी फक्त व्यासपीठावर चमकताना (चमकावे म्हणूनच?) दिसतात, तर पंजाबी मंडळी मात्र संमेलन यशस्वी व्हावे, कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये, यासाठी झटताना दिसत आहेत.