आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमानमधील मराठी ठसा : बाबा नामदेवांनंतर संत नारायणदास महाराज करत आहेत सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतश्रेष्ठ श्रीनामदेवनगरी, घुमान - पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान सध्या मराठीमय झाले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमानला मराठीचा गजर सुरू आहे. मराठी माणसे पंजाबी समजून घेत आहेत. या निमित्ताने काही मराठी बोलणारे पंजाबी घुमानकर भेटले. त्यांच्याशी संवाद साधला असता संत नारायणदास महाराज यांची माहिती मिळाली. घुमानपासून दोन ते अडीच किमीवर असलेल्या भटीवाला येथील संत नामदेव गुरुद्वार्‍याचे ते प्रमुख आहेत. तेथे जाऊन महाराजांशी संवाद साधला. तेव्हा अनेक गोष्टी उलगडत गेल्या. संत नारायणदास महाराज मूळचे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सायगावचे. लहानपणापासूनच त्यांचा परमार्थाकडे ओढा होता. गावातील देवळात भजन, कीर्तन करता करता एक दिवस ते पंढरपूरला गेले. तिथे वारकरी प्रशिक्षण संस्थेत १९६६ ते १९६९ अशी चार वर्षे भजन, कीर्तन, प्रवचन, गीता, ज्ञानेश्वरी आदी धर्मग्रंथांचे वाचन कसे करावे याचे प्रशिक्षण घेतले. त्या नंतर दोन, तीन वर्षे नाशिक आणि पुणे परिसरात प्रवचन, कीर्तनाने जनजागृती केली.

वृंदावन येथून अमृतसरला : नाशिक व पुणे परिसरात प्रवचन व कीर्तन करत असतानाच १७ ते १८ बुवा-महाराजांसोबत रासलीला पाहण्यासाठी ते वृंदावन येथे गेले. तिथून बरेचसे बुवा-महाराज पुढील शिक्षणासाठी तर काही गावाला निघून गेले, तर नारायणदास महाराज अमृतसरला आले. तिथे महािवद्यालयात ७०० रुपये महिन्यावर गीता शिकवायला सुरुवात केली. काही वर्षे गीता शिकवल्यावर १९७२ च्या सुमारास ते भटिवाला येथेच स्थायिक झाले.

घुमान येथे येऊन संत नारायणदास महाराज यांना सुमारे ४० वर्षे होत आहेत. आज दहा खोल्यांचा सुसज्ज गुरुद्वारा आहे. गुरुद्वाराला लागून असलेला तलाव खोलीकरण करून स्वच्छ करण्यात आला. दर रविवारी गुरुद्वारात माेठी यात्रा भरते. तलावात भाविक श्रद्धेने स्नान करतात. संत नारायणदास महाराजांनी चार युवकांची समिती स्थापन करून गुरुद्वाराचा कारभार त्यांना सोपवला आहे. महाराजांच्या मार्गदर्शनात गुरुद्वाराचे काम सुरू आहे. गाव सोडले तेव्हापासून ते घरी गेलेले नाहीत. आषाढी व कार्तिकी एकादशीला महाराज पंढरपूरला जातात. तिथे गावाकडच्यांची भेट होते.

मराठवाड्यातून येऊन भटिवालाचेच झाले
बाबा नामदेव भटिवाल येथे एका गुहेत तपश्चर्या करत असताना गावातील एक वृद्धा रोज सकाळी जेवण घेऊन यायची. एकदा तिला सायंकाळ झाली. महाराजांनी कारण विचारले असता गावात पाणी नाही. त्यामुळे सात किमीवरील बियास नदीवरून आणावे लागते, असे सांगितले. ते ऐकताच बाबा नामदेवांनी बाजूचा एक दगड काढून पाण्याचा संजीवन प्रवाह आणला. वृद्धा तेथून रोज पाणी भरून स्वयंपाक करायला लागली. गावकर्‍यांना समजताच तेही तिथून पाणी भरायला लागले. कालांतराने बाबा नामदेवांनी वीटभट्टी सुरू केली व गावकर्‍यांच्या मदतीने विहीर बांधली. ही िवहीर आजही अखंड पाणीपुरवठा करते.